देणाऱ्याने देत जावे
“ देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावेत. “
विं.दा. करंदीकरांच्या ह्या ओळी मानवी आयुष्यास किती तंतोतंत लागू पडतात पहा. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती अथवा घटना येते जी तुम्हाला, आयुष्यात आपले ध्येय काय असावे याची जाणीव करून देते. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी ती व्यक्ती अथवा ती घटना तुम्हाला सतत प्रोत्साहन देत राहते. जर तुम्ही ते ध्येय प्राप्त करण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेत तर यश तुमचंच असतं.
अर्थात येथे केवळ चार ओळीत हे विचार मांडून होतात. पण खरं तर आपला ध्येय काय हे ठरवल्यापासून ते सदर ध्येय गाठेपर्यंतचा प्रवास हा साधा सोप्पा सरळ कधीच नसतो. त्यात अनेक वळणं येतात. काही सुखद आठवणी देऊन जातात, तर काही अंतर्मुख करतात. दोन्ही बाबतीत एक गोष्ट मात्र समान असते ते म्हणजे आपल्याला मिळणारा ‘अनुभव’ होय. प्रत्येक वेळी आपण अनुभवाने समृद्ध होत असतो.
जर यश मिळालं, तर आपण बरोबर होतो हे कळतं. आणि जर चुकलो तर कोणत्या गोष्टी करू नयेत हे शिकता येतं. आणि हे सर्व घडून येण्यास जसे आपण जबाबदार असतो तसेच आपल्या आजूबाजूची माणसे सुद्धा जबाबदार असतात. कारण जशा व्यक्ती तशा प्रकृती. त्यामुळेच आपला ध्येयापर्यंतचा प्रवास अविस्मरणीय होतो.
मजल दरमजल करत आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचतो. आणि मागे वळून पाहिलं, तर एक सुंदर प्रवास केल्याची अनुभूती मनाला होते. दुखःद क्षणांमुळे मनाला आलेली मरगळ निघून जाते. चित्तवृत्ती प्रसन्न होतात. आणि त्यावेळी, आपल्याला कवितेच्या त्या शेवटच्या दोन ओळींची अनुभूती यावयास लागते. कारण एवढा प्रवास केल्याने अनुभवाचं गाठोडं जे जमा होतं, त्याचा उपयोग करावयाची वेळ आलेली असते.
कारण ध्येयाच्या शिखरावरून तुमच्या सारखे अनेक ध्येयवेडे प्रवास सुरु करत असतात. आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला मदत केली, त्या व्यक्तीची जागा तुम्ही घेणं गरजेचं असतं. पण तरीही तुम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाहीत. पण तुमच्या प्रवासाचा मागोवा घेणाऱ्या प्रत्येकास तुमच्या वागण्या बोलण्यातून मात्र प्रेरणा नक्कीच मिळू शकते. आणि तुम्ही जेव्हा अशी कळत-नकळत मदत करता तेव्हा विं.दा. करंदीकरांच्या कवितेच्या ओळी सत्यात उतरतातच. पण त्याचसोबत एक वर्तुळ पूर्ण होतं. तुम्ही केलेल्या ध्येयवेड्या प्रवासाचं सार्थक होतं

Comments
By ur blog I just remembered साहित्यिक बहिणाबाई चौधरी's poem,
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।