मला भेटलेली खास व्यक्तिमत्त्वं - ब्लॉग पहिला - राहुल आरेकर.
राहुल आरेकर. आपल्या पैकी अनेकांना परिचित अपरिचित असं नाव. अपरिचित या साठी कारण हा कोणी मोठा सेलिब्रिटी नाही. पण परिचित यासाठी कारण गेल्या नऊ वर्षांत याचे विचार कधी ना कधी तरी आपल्याला स्पर्शून गेलेले असतात. अगदी आपल्या न कळत. पण त्याचे विचार आपल्याला पटतात हे नक्की. तो आम्हा मित्रांसोबत कीर्ती कॉलेजमध्ये शिकला. ही वेळ आपल्याकडे फेसबुक चा उदय होण्याची. आम्ही सगळे फेसबुकचा वापर वेळ घालवण्यासाठी करायचो. त्यावेळी या पठ्ठ्याच्या लक्षात आलं की फेसबुक चं पेज तयार करता येईल. इथपर्यंत आम्हीही विचार केला होता. पण कृती केली नाही. इथेच राहुलचं वेगळेपण अधोरेखित करावंसं वाटतं. या फेसबुक पेजच्या माध्यमांतून कमाई करता येते हे त्याने ओळखलं. आमच्या डोक्यात एवढा विचारही नव्हता. पण आज जेव्हा डिजिटल मार्केटिंग चं प्रस्थ एवढं वाढलेलं असताना त्याच्या दूरदृष्टीची कल्पना यावी. पण त्याचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. त्याचं पहिलं पेज त्याला काही कारणांमुळे बंद करावं लागलं. अर्थात आपल्याकडे एक म्हण आहेच, "अपयश ही यशाची पहिली पायरी असते". कारण यामुळे खचून न जाता त्याने त्याचं दुसरं पेज सुरू केलं आणि म...