Posts

Showing posts from October, 2015

टाटांविषयी वाचलेले अजून एक उत्तम पुस्तक – द रोमान्स ऑफ टाटा स्टील

काही दिवसांपासून ‘द रोमान्स ऑफ टाटा स्टील’ हे पुस्तक वाचतो आहे. या आधी गिरीश कुबेर यांचं ‘टाटायन’ वाचलं होतंच. पण आता आर. एम. लाला यांचं हे पुस्तक वाचनात आल्याने टाटा स्टील या कंपनीच्या जन्माआधीपासून ते आजपर्यंतचा प्रवास बारकाईने वाचता आला आहे. जमशेटजी टाटा या भारतीय उद्योग विश्वाच्या भीष्मपितामहांनी हि कंपनी उभारण्याचे स्वप्न पहिले आणि आपल्या अलौकिक प्रयत्नांनी कंपनी वास्तवात आणण्यात यश मिळवले. अलौकिक म्हणण्याचे कारण असे कि स्वातंत्र्यपूर्व काळात अशी स्वप्ने बघणे आणि ते हि एका भारतीयाने हे दुरापास्तच होते. पण तरीही त्यांनी हे स्वप्न पहिले. त्याचा कित्येक वर्षे सतत पाठपुरावा केला.  तरुणपणी इंग्लंडला असताना एका व्याख्यानात पोलाद उद्योग एखाद्या देशास पुढील काळात प्रगतीशील बनवू शकतो अशा आशयाचे व्याख्यान ऐकले. तेव्हापासून आपले इतर उद्योग खासरून कापड गिरण्या सांभाळत त्यांनी पोलाद उद्योगाची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. लक्षात घ्या तो कालखंड. आज आपल्याला काही क्लिक्स वर सर्व माहिती उपलब्ध असते. त्या काळी त्यांना तशी सुविधा न्हवती. तरीही जीवाचं रान आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी...