‘आगे कि सोच’
Aage ki soch ‘आगे कि सोच’ पाठच्या गाडीवाल्याला एका वाक्यात बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लावणारा हा टॅक्सीवाला. त्याच्या हुशारीचं कौतुक वाटलं आणि गंमत म्हणून हा फोटो काढला. पण खरं तर मंडळी, हा संदेश आपण सर्वांनीच गंभीरतेने घेणं नक्कीच गरजेचं आहे याची सर्वांना कल्पना आहेच. गेल्या काही दिवसापूर्वी वॉरेन बफे यांच्या तत्वज्ञानाविषयी एक पुस्तक वाचण्यात आलं. ‘ताओ ऑफ वॉरेन बफे’ असं त्या पुस्तकाचं नाव. वॉरेन बफे यांच्या पूर्वाश्रमीच्या सुनबाई आणि एका विद्यार्थ्याने हे पुस्तक लिहिलं आहे. यात वॉरेन बफे यांचे पैसे कसे कमवावेत, गुंतवावेत आणि संचय कसा करावा याचे तत्वज्ञान आहे. यातील बरेचसे मुद्दे हे केवळ पैशांना लागू न होता आपल्या आयुष्यालाही लागू होतात. आणि बफे हे आर्थिकदृष्ट्या आणि संस्कारांनीही किती श्रीमंत आहेत याची खात्री पटते. आज आपण सर्वांनीही वॉरेन यांच्यासारखे आचार विचार अवलंबणे महत्वाचे आहे हे नक्की. कारण वॉरेन यांचे हे बहुमूल्य विचार एक सर्वोत्तम समाज निर्मितीसाठी आणि आर्थिक सधनता मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत. आणि ते तसे आहेत कारण ते दीर्घकालीन आहेत. ‘आगे कि सोच’ त्यात आहे. आण...