Posts

‘आगे कि सोच’

Image
Aage ki soch  ‘आगे कि सोच’  पाठच्या गाडीवाल्याला एका वाक्यात बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लावणारा हा टॅक्सीवाला. त्याच्या हुशारीचं कौतुक वाटलं आणि गंमत म्हणून हा फोटो काढला. पण खरं तर मंडळी, हा संदेश आपण सर्वांनीच गंभीरतेने घेणं नक्कीच गरजेचं आहे याची सर्वांना कल्पना आहेच. गेल्या काही दिवसापूर्वी वॉरेन बफे यांच्या तत्वज्ञानाविषयी एक पुस्तक वाचण्यात आलं. ‘ताओ ऑफ वॉरेन बफे’ असं त्या पुस्तकाचं नाव. वॉरेन बफे यांच्या पूर्वाश्रमीच्या सुनबाई आणि एका विद्यार्थ्याने हे पुस्तक लिहिलं आहे. यात वॉरेन बफे यांचे पैसे कसे कमवावेत, गुंतवावेत आणि संचय कसा करावा याचे तत्वज्ञान आहे. यातील बरेचसे मुद्दे हे केवळ पैशांना लागू न होता आपल्या आयुष्यालाही लागू होतात. आणि बफे हे आर्थिकदृष्ट्या आणि संस्कारांनीही किती श्रीमंत आहेत याची खात्री पटते. आज आपण सर्वांनीही वॉरेन यांच्यासारखे आचार विचार अवलंबणे महत्वाचे आहे हे नक्की. कारण वॉरेन यांचे हे बहुमूल्य विचार एक सर्वोत्तम समाज निर्मितीसाठी आणि आर्थिक सधनता मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत. आणि ते तसे आहेत कारण ते दीर्घकालीन आहेत. ‘आगे कि सोच’ त्यात आहे. आण...

डॉ. कलाम यांच्याविषयी माझ्या भावना

माणूस जन्मास येतो. माणूस एके दिवशी मरून जातो. माणसाचं आयुष्य हे असं दोन वाक्यांत सुरु करून संपवता हि येतं. आणि हे केवळ मला, तुम्हालाच नाही तर प्रत्येकास लागू पडतं. कारण जन्माला येणे आणि देहावसान होणे अजूनतरी कोणत्याही सजीवास चुकलेले नाही आणि नजीकच्या काळात तशी शक्यताही नाही. पण काही माणसे मात्र एवढी कर्तुत्ववान असतात कि या दोन वाक्यात कितीही वाक्ये लिहिली तरीही ती अपुरी वाटावीत. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या देहावसानानंतर याची खात्री पटते. डॉ.कलम यांच्या निधनाने सर्व भारतीयांवर शोककळा पसरली. प्रत्येक जण आपापल्या परीने त्यांना श्रद्धांजली वाहू लागला. सोशल नेट्वर्किंग साईट्स वरून आणि इतर माध्यमातून याचा प्रत्यय कोणासही यावा. पण या सर्व जणांमध्ये एकानेही त्यांच्याविषयी अनुद्गार काढल्याचे दिसत नाहीत. उलट त्यांच्याविषयी वाटणारे प्रेम सर्वत्र दिसते. प्रत्येक जण आपापल्या परीने त्यांना आपल्या मनात साठवू पाहताना दिसला. भारताला शस्त्रसुसज्ज बनवण्यात डॉ.कलामांनी सिंहाचा वाटा उचलला. अहिंसावादी होते तरीही शस्त्र आणि देशाच्या संरक्षणासाठीचे त्याचे महत्व त्यांनी ओळखले होते. अर्थात सर्व काही त्यां...

डॅन ब्राऊनच्या पुस्तकांविषयी बोलू काही...

डॅन ब्राउन. आजच्या काळातील आघाडीच्या लेखकांपैकी एक. द दा विन्सी कोड, इन्फर्नो , एन्जेल्स अँड डेमन्स , द लॉस्ट सिम्बॉल या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांबरोबरच इतर हि पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या विषयामुळे आणि त्यातील माहितीमुळे काही पुस्तके वादाच्या केंद्रस्थानी राहिली. पण यामुळे त्यांचे चाहते आणि विरोधक दोन्ही वाढले. परिणामी डॅन ब्राऊन हे सतत चर्चेत राहिलेलं नाव आहे. वर नमूद केलेली चारही पुस्तके हि वाचकांच्या विशेष आवडीची आहेत कारण यातील नायक, रॉबर्ट लँगडन त्यांना भावतो. त्याचं प्रतिकशास्त्रातील (Symbology) ज्ञान वादातीत आहेच पण आलेल्या परिस्थितीला धीराने आणि समयसूचकता वापरून सामोरं जाण लोकांना भावत असावं. तसा तो जेम्स बॉंड नाही, पण प्रत्येक कादंबरीत त्याला नाव नवीन स्त्री सहकारी गूढ रहस्यांची उकल करण्यास मदत करतात. तो त्यांच्यात गुंततो पण अगदी काही काळासाठी आणि त्याचं नशीब प्रत्येक वेळेस त्याला नवीन आव्हानांनसमोर आणून उभं करतं. आणि हा अगदी सामान्यातला नायक बाह्या सरसावून उभा ठाकतो. आपली बुद्धिमत्ता वापरून समस्येचा पदाव करतो आणि शेवटी तुम्हा आम्हाला विचार करण्यास ...

मला भावलेले पुस्तक 'टाटायन'.

मी तसा पुस्तकांचा चाहता आहे. त्यामुळे वाचन हे सतत चालू असतं. नुकतंच वाचनात आलेले पुस्तक म्हणजे ‘ टाटायन ‘ होय. टाटा कुटुंबीय आणि टाटा समूह हा या पुस्तकाचा मध्यवर्ती विषय. लोकसत्ताचे सध्याचे संपादक आणि सिद्धहस्त लेखक श्री. गिरीश कुबेर यांनी याचे लेखन केले आहे. त्यांच्या इतर सुप्रसिद्ध पुस्तकांप्रमाणेच हे पुस्तकही वाचकांना खिळवून ठेवते. ओघवत्या भाषेमुळे हे पुस्तक एका बैठकीत पूर्ण करावे असेच वाटते. पण टाटा या आडनावाभोवती फिरणारा इतिहास आणि वर्तमान काळ काही थोडा थोडका नाही. त्यामुळे इच्छा असूनही काही दिवस लागतातच. पण त्यातही आनंद मिळतोच. कारण मिठाई एकदम खा किंवा थोडी थोडी. तिचा गोडवा कायम असतो. आता हे पुस्तक आपल्याला काय देतं, असा विचार केला तर उत्तर येतं, बरच काही. पण त्यातील मला भावलेल्या आणि महत्वाच्या काही गोष्टी खालील प्रमाणे. अर्थात हि समीक्षा नव्हे हे लक्षात असू द्या. हि आहे एका वाचकाची पावती.  पहिली गोष्ट हे पुस्तक शिकवतं, ते म्हणजे तुमची घरची पार्श्वभूमी कशीही असो, जर स्वतः वर विश्वास असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश, पैसा, प्रसिद्धी आपल्या समोर हात जोडून उभे राह...

देणाऱ्याने देत जावे

“ देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. “ विं.दा. करंदीकरांच्या ह्या ओळी मानवी आयुष्यास किती तंतोतंत लागू पडतात पहा. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती अथवा घटना येते जी तुम्हाला, आयुष्यात आपले ध्येय काय असावे याची जाणीव करून देते. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी ती व्यक्ती अथवा ती घटना तुम्हाला सतत प्रोत्साहन देत राहते. जर तुम्ही ते ध्येय प्राप्त करण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेत तर यश तुमचंच असतं. अर्थात येथे केवळ चार ओळीत हे विचार मांडून होतात. पण खरं तर आपला ध्येय काय हे ठरवल्यापासून ते सदर ध्येय गाठेपर्यंतचा प्रवास हा साधा सोप्पा सरळ कधीच नसतो. त्यात अनेक वळणं येतात. काही सुखद आठवणी देऊन जातात, तर काही अंतर्मुख करतात. दोन्ही बाबतीत एक गोष्ट मात्र समान असते ते म्हणजे आपल्याला मिळणारा ‘अनुभव’ होय. प्रत्येक वेळी आपण अनुभवाने समृद्ध होत असतो. जर यश मिळालं, तर आपण बरोबर होतो हे कळतं. आणि जर चुकलो तर कोणत्या गोष्टी करू नयेत हे शिकता येतं. आणि हे सर्व घडून येण्यास जसे आपण जबाबदार असतो तसेच आपल्या आजूबाजूची माणसे सुद्धा जबाबदार ...