चुंबक : प्रेक्षकपसंती खेचून घेणारा चित्रपट !!
ही ब्लॉग पोस्ट लिहीत असताना, मराठी चित्रपटांनी कोविड काळातलं पुनरागमन दणक्यात केलं आहे. एवढं की, पावनखिंड या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ही जवळपास सात ते आठ राज्यांत या सिनेमाचं प्रदर्शन होऊ घातलं आहे अस कळतं. एका अर्थाने सीमोल्लंघनच आहे ते ! त्याआधी आलेल्या पांघरूण, झिम्मा यांनीही जबरदस्त कामगिरी केली आहेच. मुळातच आशयघनता हा आपल्या मराठी चित्रपटांचा गाभा राहिला आहे. तो आजही तसाच टिकून आहे.तसेच आज त्यास अपेक्षित अशी लोकप्रियता आणि प्रसिद्धी ही मिळते आहे. अर्थात काळासोबत त्यात अनेक उत्तम गोष्टींची भर ही पडत गेली आहेच. त्यामुळे असे हे आशयघन चित्रपट आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ही मोठ्या प्रमाणात नावाजले जात आहेत. याच मांदियाळीतील एक चित्रपट म्हणजे 'चुंबक' होय. लोकप्रिय गीतकार स्वानंद किरकिरे आणि उदयोन्मुख कलाकार साहिल जाधव यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेला हा चित्रपट ! खरं तर या सिनेमाचा ट्रेलर मी बऱ्यापैकी आधी बघितला होता. पण आज बघू, उद्या बघू करून हा चित्रपट बघणं पुढे पुढे जात होतं. शेवटी एके दिवशी वेळ मिळाला आणि म्ह...